शहापुरातील वाहतूक कोंडी सूटणार कधी;नागरिकांचा संतप्त सवाल....  


शहापुर: गेल्या कित्येक वर्षांपासून शहापुर बाजारपेठेतील वाहतुक कोंडीची समस्या आजही जैसे थे आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सूटणार कधी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. तर वर्षोनुवर्षे  वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच बाजारपेठ जूना आग्रा रोडवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. या ठिकाणी रोज सकाळी  माल वाहतुक मोठ्या ट्रक उभ्या असतात. तर चारचाकी गाडी भर रस्त्यात लावल्या जातात,  त्यातच दुचाकीस्वाराची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे रस्त्यावर चालणेही नागरिकांना मुस्किल झाले आहे. परिणामी वयोवृद्घ, लहान मुले, महिला यांचा अपघात होण्याची शक्यता नाकराता येत नाहीं.


तर उपजिल्हा रुग्णालय पार्किंगस्थळ झाल्याची चर्चा खुलेआम होत आहे. परिणामी उपजिल्हा रुग्णालया समोर वाहतूक कोंडी बऱ्याच वेळापर्यन्त असते.  त्यामुळे या  ठिकाणाहुन रुग्णवाहिका नेणेही अवघड दिसत आहे. त्यामुळे एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल तर त्याला वाहतूक कोंडीचा फटका बसुन वेळेवर उपचार मिळू शकणार नाही. असे गंभीर आरोप भाजपा अल्पसंख्याक विभागाचे शहापुर तालुका अध्यक्ष साजिद शेख यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत केले आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडीवर संबंधित प्रशासनाने उपाययोजना करून वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवून  नागरिकांना मोकळा स्वास घेता येईल ही माफक अपेक्षा साजिद शेख यांनी नागरिकांच्या वतीने व्यक्त केली आहे.   


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...