अतिदुर्गम भागातील वाल्हिवरे गावात बस सुरू करा - उपसभापती अरूणा रघुनाथ खाकर
अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या गावातील लोकांना दवाखान्यात, बॅंकेत, शासकीय दाखले, किराणा साहित्य आणण्यासाठी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते, परंतू बसगाड्यांची सोय नसल्यामुळे अनेक लोकांना पायी चालत दवाखान्यात यावे लागते. गाडीची सोय नसल्यामुळे आदिवासी भागातील गरीब जनतेला फार ञास सहन करावा लागत आहे.
आदिवासी भागातील वाल्हिवरे, केळेवाडी, कुंभाळे, न्याहाडी, मोरोशी, दिवणपाडा, आवळेवाडी, भोरांडे, भोईरवाडी, डोंगरवाडी, शिसेवाडी अश्या अनेक गावांतील लोकांना बसगाड्यांची सोय नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तरी मुरबाड एसटी महामंडळाने लवकरात लवकर वाल्हिवरे बस सुरू करावी अशी मागणी सौ.अरूणा रघुनाथ खाकर उपसभापती पंचायत समिती मुरबाड यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.