कल्याण : डोंबिवली जिमखान्यातील कोविड रूग्णालयाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडून ऑनलाईन लोकार्पण
कोरोनाविरोधात सर्वच स्तरावर संघटीतपणे काम सुरू असुन महाराष्ट्राला लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढू असा आशावाद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.डोंबिवली जिमखाना येथे कोविड रुग्णांसाठी समर्पित कोविड रूग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण करताना त्यांनी हे वक्तव्य केले.असिम्टोमॅटीक पेशंटला देखील व्यवस्थीत आयसोलेशन करणे गरजेचे आहे . कोरोनाशी लढण्यापेक्षा त्यापासुन दुर राहणे आपले हाती आहे . गावागावात कोरोना बाबत दक्षता कशी घ्यावी याची जनजागृती करावी म्हणजे कोरोनाची काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले .
कोरोनाशी लढून हरविण्यपेक्षा कोरोना होणारच नाही या साठी शक्यतोवर काळजी घ्यावी , देशांत ठाणेमहपालिकेचा रिकव्हरी रेट ८९ % आहे व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा रिकव्हरी रेट ८५ % आहे . हे दिलासादायक चित्र असल्याचे उद्गार उपुमख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी काढले . या रूग्णालयात ५१ ऑक्सीजन बेड उपलब्ध असून त्यातील ०३ बेडडायलिसीस रूग्णाकरीती राखीव ठेवण्यात आलेले आहेत . या व्यतिरिक्त ३० व्हॅंटिलेटर आणि ४० Baipap आणि ५ High Flow Nasal Oxygen Machine सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे .या रुग्णालयात रूग्णांसाठी अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आलेली असुन संपुर्ण रूग्णालय हे वातानुकुलीत आणि इंटरनेट सुविधायुक्त आहे .