पोलीस मागावर असल्याने खंडणीसाठी केलेला अपहरणाचा डाव फसला...
उल्हासनगर- अपहरणकर्त्यांनी ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले.५०लाखावरून १० रुपयापर्यंत मागणी करण्यात आली.मात्र पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच अपहरण करणाऱ्यांनी व्यापाऱ्याला सोडून पळ काढला.पण हिल लाईन पोलिसांनी त्यांचा छडा लावून चौकडीला बेड्या ठोकल्या.उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये राहणारे जीन्स व्यापारी हे २१ तारखेला भाटीया चौकातून रिक्षाने दुकानात जाण्यास निघाले होते.मात्र रिक्षा ही दुकानाच्या दिशेऐवजी वेगळ्याच दिशेने जात असल्याचे बघून सनीने आरडाओरडा केली.पण जोरात पडणाऱ्या पावसाच्या आवाजाने सनीचा आवाज नागरिकांना पर्यंत पोहचू शकला नाही. अपहरणकर्त्यांनी सनीला नकली रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बेदम मारहाण करत रायता नदीच्या दिशेने नेले.सनीच्या मोबाईल वरून अपहरणकर्त्यांनी ५० लाखाच्या खंडणीसाठी सनीच्या घरच्यांना रुपये नाही दिल्यास मुलाचा खून करू अशी धमकी घरच्यांना दिली.
सनीच्या वडिलांनी हिललाईन पोलीस ठाणे गाठून संबंधित प्रकार पोलिसांना सांगितला.पोलिसांनी तात्काळ सायबर सेलच्या मदतीने लोकेशन काढून दोन टीम रवाना केल्या. काहीं तास आरोपींनी सनीचा मोबाईल बंद केला आणि तोंडात कापडाचा गोळा कोंबला.सनीचा जीव काही करून वाचवायचा आहे, परंतु आरोपींचा सतत स्थलांतर आणि लोकेशन भेटत नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभे राहिले होते.शेवटी आरोपींचे लोकेशन प्राप्त झाल्यावर पोलीस आणि आरोपी असा पाठलाग सुरू झाला. आरोपींना पोलीस पाठलाग करत असल्याचे समजताच आरोपींनी सनीची सुटका केली.हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी सनीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यातील एका आरोपीचे सनी सोबत व्यापार संबंध असल्याचे समोर आले आहे.
सनी हा कमजोर मनाचा असल्याचा फायदा घेऊन आरोपींना असे वाटले की सनीला धमकावल्याने पैसे भेटतील आणि आपली आर्थिक अडचण दूर होईल.पोलिसांनी याप्रकरणी बदलापूरातील चौघांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी सनीचे अपहरण केल्याची कबुली दिली आहे.न्यायालयाने त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत,पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक विनोद कदम, बाबा जाधव, पोलीस नाईक पंढरीनाथ झोडगे, अमित चौपडे, पोलीस शिपाई शैलेश गायकवाड, विजय खरटमल,सुजित तायडे यांनी कामगिरी बजावली असून पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी संजय सावंत यांच्या टीमला शाबासकी दिली आहे.