किन्हवलीत भाजपाचे "दार उघड उद्धवा,दार उघड"  घोषणा देत घंटानाद आंदोलन



किन्हवली- महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक संस्थाने खुली करा या मागणीसाठी काल भाजपच्या किन्हवली विभागाने येथील हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले.भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील  व भाजपचे ठाणे जिल्हा प्रमुख आमदार किसन कथोरे  यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व भाजपाचे गटनेते सुभाष हरड यांच्या नेतृत्वाखाली किन्हवली हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.


यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश  विशे,भाजपचे जेष्ठ नेते गणपत शिद ,विभागप्रमुख अशोक गगे,किन्हवली गणाचे शक्तिकेंद्रप्रमुख नितिन ठाकरे,भावेश देशमुख आदी भाजपा कार्यकर्ते घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते. "दार उघड उद्धवा,दार उघड" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी घंटानाद  आंदोलन केले आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...