रामनाथ मोते सर उर्फ अण्णा 'एक चालत बोलत विद्यापीठ'....
रामनवमी च्या दिवशी ज्यांचा जन्म झाला होता, त्या रामनाथाला प्रभू रामचंद्रा सारखाच उभ्या हयातीत संघर्षमय जीवन जगावे लागले, पराकोटीची घरची गरिबी त्यामुळे रोजगाराच्या शोधत उल्हासनगरला आलेले रामनाथ मोते सर यांनी मिळेल ते काम करत आपले शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर याच शहरातील आर.के आभंग विद्यालयात इंग्रजीचे शिक्षक म्हणून आपल्या पवित्र शिक्षकी पेशाचे व्रत सुरू केले. सतत हसरा चेहरा आणि कठीण विषय सोपा करून सांगण्याची त्याची शैली त्यामुळे ते विध्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून अल्पकालावधीत नावारूपाला आले.
अध्ययन अध्यापन करत असताना त्यांना त्याची समाज कार्याची धडपड स्वस्थ बसू देत नव्हती ,त्यामुळे फावल्या वेळात शिकविण्या घेऊन पैसे कमवण्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य शिक्षकांच्या छोट्या मोठ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले, हे करताना प्रथम त्यांनी कायद्याची स्वतः पूर्णपणे माहिती करून घेतली , परिणामी मोते सर समस्या घेऊन गेले की , ती चुटकीसरशी सुटत असे,अधिकाऱ्यांना ही प्रश्न कसा सुटेल हे सांगून त्याची ही अडचण ते दूर करत असत,आणि शिक्षक वर्गाला न्याय ही देत असत, त्याच्या कामसू व अभ्यासू स्वभावामुळे आपला हक्कचा माणूस म्हणून समस्त शिक्षक वर्ग त्याच्याकडे आकर्षित होऊ लागला, आणि सर्वांना न्याय देण्याचा विश्वात रामनाथ मोते सरांच कुटूंबाकडे दुर्लक्ष होत गेलं मात्र आधी सेवा कर्म मगच कौटुंबिक धर्म ही त्याची जीवनशैलीनी त्यांना घडवलं आणि शिक्षक ते दोन वेळा विधानपरिषदेत शिक्षक आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली, या संधीच सोन करत त्यांनी असंख्य शिक्षक बंधू भगिनींचे प्रलंबित प्रश्न सोडविले, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्याची तत्वप्रणाली यामुळे आमदार असताना ते शाळेत गेले तर लहान लेकराना आदर्श संस्कार क्षम धडे देत, तर आधिकारी वर्गला तितक्याच कठोर शब्दांत सूनवुन शिक्षकांची कामे त्वरित मार्गी लावून घेत असत,
आमदार म्हणून विधानपरिषद गाजवून सोडणारे ते,अभ्यासू सदस्य होते. उत्कृष्ट,अभ्यासू विधानपरिषद सदस्य म्हणून त्याचा गौरव झाला आहे, ही त्याच्या संघर्षमय कामाची पोहच पावती आहे, दोनदा आमदार असलेला हा माणूस धन संपत्तीच्या फेऱ्यात कधीच अडकला नाही, उलट आपले आमदार निवसातील घर ही आवो जावो घर तुम्हारा या पद्धतीने त्यांनी ठेवले होते, फक्त शिक्षकांच्या हितासाठी लढायचं आणि जगायचं हे व्रत त्यानी अखेरच्या श्वासा पर्यत पाळले त्यामुळे डोक्यात ना आमदारकी घुसली ना मिळालेली पदे घुसली ,असा हा माणूस या जन्मातील खराखुरा राम होता , त्याने गणपती उत्सवाच्या दिनी आपल्यातून अखेरचा निरोप घेतला आहे, असा हा शिक्षकांचा आधारवड आज आपल्यातून इहलोकातून स्वर्ग लोकी गेला आहे, 'जो आवडतो सर्वाना l तोचि आवडे देवाला ll' या उक्ती प्रमाणे हे विधात्या आमच्या सर्वसामान्य शिक्षकांच्या हितासाठी झटणाऱ्या रामनाथाला आमच्या अण्णा ना तुझ्या नजीक स्थान दे हीच तुला मनःपूर्वक प्रार्थना......
रवींद्र घोडविंदे
संपादक ठाणे जीवनदीप वार्ता ,
अध्यक्ष जीवनदीप शैक्षणिक संस्था