एक अविरत शैक्षणिक वादळाचा अस्त...
भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने
"कार्यकर्त्यांचे अण्णा" रामनाथ मोते सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शिक्षकांचा देव गेला, क्षणार्धातच सर्वांचे पितृतुल्य व्यक्तीमत्व आदरणीय अण्णां आज काळाच्या पडद्या आड गेले. संपूर्ण शिक्षक वर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला. सर्वत्र अश्रू अनावर झालेत. सर्वांची मने भूतकाळाचा मागोवा घेत आहेत. प्रत्येक जन अण्णांनी आपल्यासाठी कायकाय केले याचे स्मरण करत आहे. हजारो शिक्षकांच्या घरची चूल त्यांनी पेटवली. शिक्षकांच्या अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडली. अनाथांचा नाथ रामनाथ अशी देवतुल्य प्रतिमा त्यांनी आपल्या कार्याच्या रूपाने बनवली होती. सध्या गरीब शेतकरी कुटूंबाबत त्यांचा जन्म झाला होता त्यामुळे ते सदैव साधेपणाने राहिलेत. परिषदेचा तळमळीचा, स्वतःला झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता, आपला माणूस म्हणून त्यांनी कमी वेळात नाव लौकिक मिळवला. आयुष्यातील अनेक चढउतार त्यांनी पाहिले मात्र आपल्या कार्याचा वसा सोडला नाही. कधी डगमगले नाही. शिक्षकांच्या, पालकांच्या, विद्यार्थ्याच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या बद्दल एक प्रसिद्ध उक्तीहोती रामनाम मोते कभी नही सोते
गेल्या अनेक महिन्यांपासून अण्णांची ताब्बेत तशी साथ देत नव्हती परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी मात्र शिक्षकांचे प्रश्न सोडवणे सोडले नाही. अधिकाऱ्यांनाही आदरयुक्त धडकी भरवणारे, शिक्षणाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत तसेच अवघ्या महाराष्ट्राला आपल्या धडाडीच्या कार्यकामुळे मोते सरांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच त्यांच्याठायी असंख्य लोकं नतमस्तक होत होती. त्यांनी त्यांच्याकडे समस्या घेऊन आलेल्या प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर यांना समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले. त्यांनी अनेक प्रामाणिक कार्यकर्ते घडवले. मोते सर म्हणजे एक तरुण तडफदार कायदेपंडित , न्यायाची चाड असणारा , दिन दुबळ्यान्चा कैवारी , अनाथांचा नाथ न्यायदेवतेवर विश्वास असलेला शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन करणारा निष्णात डॉक्टरच कारण गरजु अन्यायग्रस्त माणूस मोते सर यांना भेटल्यावर रडक्या चेहऱ्याने गेलेला माणूस हसऱ्या समाधानी चेहऱ्याने परतत असे कारण कोणतेही आश्वासन वैगरे देत न राहता लगेचच लेखणी हातात घेउन शिक्षणाधिकारी ते मंत्रालय प्रकरण परत्वे तातडीने पत्रव्यवहार करत असत ते पत्र अतिशय खरमरीत व शेवटी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मला आठ दिवसात कळवावा असे बहुतांश वेळा वाक्य असायचेच त्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागून प्रश्न मार्गी देखिल लागायचे जे न्यायालयात जाणे आवश्यक असेल त्यांना तसा सल्ला देउन वकील बांदिवडेकर यांना फोन करून त्या व्यक्तीच्या सर्व केस ची पूर्ण माहिती मोतेसर च देत असत दोन वर्षांपुर्वी भरतीबंदी असतानादेखील राज्यातील एकमेव कला शिक्षक याची नियुक्ती योग्य असल्याचा न्यायालयाने निर्वाळा दिला त्या एका निर्णयामुळे राज्यात शेकडो मागासवर्गीय रखडलेल्या मान्यता मार्गी लागल्या . भरतीबंदी काळात मागासवर्गीय भरती साठी बंदी नाही हा मुद्दा न्यायालयात मांडला. शिक्षक आमदार असूनही स्वतःचा बंगला नाही साध्या चाळीत राहणे . भ्रष्टाचाराचा लवलेश ही नसणारे व कोणत्याही व्यक्ती पेक्षा नियमानुसार कामाला प्राधान्य देणारे मोते सर दररोज सकाळी सात वाजता कार्यालयात (कल्याण ) येथे उपस्थित असणारे (उल्हासनगरहून ) हे किती वक्तशीर होते यावरून लक्षात येइल असा आमदार दूर्मीळच म्हणावा लागेल.
जर एखादा अगदी उच्च पदस्थ अधिकारी नियमानुसार काम करत नसेल तर त्याला अगोदर ते काम करण्यासाठी अर्ज विनंती करत असत तरीही केले नाही तर मात्र पूर्वकल्पना देउन आपल्या कार्यकर्त्यासह कार्यालयात उपोषणाला देखिल बसत असत व ते काम होत आहे किंवा नाही हे लेखी मागत असत. या प्रकारच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेक कामे मार्गी लागत असत . २ मे २०१२ नंतर भरती बंदी काळात खास बाब म्हणून राज्यातील गणित विज्ञान इंग्लिश या पदाना मंजुरी मिळण्यासाठी व नियुक्ती केलेल्या शिक्षकाना मान्यता मिळण्यासाठी मोते सर यानी केलेली मेहनत पत्रव्यवहार अनमोल आहे. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना लेखाधिकारी कार्यालय / शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी घेतलेल्या आढावा सभा खूप गाजलेल्या आहेत . शिक्षकांच्या हिताच्याच ठरलेल्या आहेत . आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे मोते सर आशास्थान , श्रद्धास्थान , प्रेरणा होते कारण कोणाचा काही प्रश्न असेल तर हक्काने मोते सर आमचे आश्रयस्थान असायचे . आज मात्र आमचा हक्काचा माणूस काळाने हिरावून नेला आहे . मोते सर यांनी पाडून दिलेल्या पायंड्यानुसार कोणाकडूनही काहीही न घेता पूर्णपणे भ्रष्टाचार विरहीत निस्वार्थीपणे काम करणे व दिन दुबळ्या तसेच अन्यायग्रस्त शिक्षकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.
मोते सर आपल्याला सोडून देवाघरी गेले हे न पटणारे आहे . आदरणीय मोते सर आपण केलेले मार्गदर्शन केलेली मेहनत केलेली निस्वार्थी सेवा समर्पित भावनेने केलेले काम आम्ही कदापी विसरणार नाही . पितृतुल्य अण्णांना त्रिवार सलाम मानाचा मुजरा. भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने मा. स्व. रामनाथ मोते सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य संयोजिका डॉ कल्पना पांडे , प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग संयोजक एन. एम. भामरे , सह संयोजक किशोर पाटील, विनोद भानुशाली, कल्याण जिल्हा संयोजक विनोद शेलकर, ठाणे ग्रामीण संयोजक जगदीश पाटील, सिंधू शर्मा, संदीप कालेकर, जी. ओ. माळी, प्रकाश सोनार, वसंत सावंत, हिरामण कोकाटे, भगवान परब,दिलीप चव्हाण, आनंद शेलार, सुभाष सरोदे.