पाव खारीचा धंदा त्याच्या जीवावर बेतला.....
कल्याण : लॉकडाऊनचा काळात लॉड्रीचा धंदा बंद पडल्याने कुटंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेजाऱ्याला पाहून अमरबहादूर याने देखील पाव खारी विक्रीचा धंदा सुरु केला. मात्र शेजारी असलेल्या दुकानदाराने आपल्या साथीदारांसह आमच्यापेक्षा स्वस्तात पाव का विकतो असे विचारत त्याला मारहाण केली यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अमर यांचा भाऊ रोशनलाल याला देखील तिघांनी बेदम मारहाण केली या मारहाणीत रोशनलाल याचा मृत्यू झाला . कल्याणच्या वालधूनी परिससरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सलाउद्दीन अन्सारी,कशमुद्दीन अन्सारी ,मोहम्मद अन्सारी या तीन जणांना अटक केल्याची माहिती एसीपी अनिल पवार यांनी दिली .
कल्याण येथील वालधूनी परिसरात अमरबहादूर कनोजिया हे लॉंद्री चा व्यवसाय करुन ते आपली पत्नी, दोन मुली या उदरनिर्वाह करीत होते. कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाला. लॉकडाऊनच्या काळात लॉण्ड्रीचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला. अमर यांच्या शेजारी सल्लाद्दीन अन्सारी यांचा खारी पाव विक्रीचा धंदा होता. लॉकडाऊनच्या काळात अमर आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी देखील पाव खारी विक्रीचा धंदा सुरु केला.अमर कडे ग्राहक वाढल्याने काही तरी कारण काढून सल्लाउद्दीन हा अमरबहाद्दूर यांच्यासोबत भांडण करीत होता. आज सकाळी सलाउद्दीन चा साथीदार मोहम्मद याने आमच्यापेक्षा स्वस्त पाव विकतो असे बोलत सलाउद्दीन अन्सारी,कशमुद्दीन अन्सारी ,या तिघांनी अमरबहाद्दूर यांच्याशी वाद घालत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी अमर यांचा भाऊ रोशनलाल भांडण सोडवण्यास आला असता या तिघांनी रोशनलाल यांच्यावर हल्ला केला. या मारहाणी दरम्यान रोशनलालचा मृत्यू झाला. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसानी सलाउद्दीन अन्सारी,कशमुद्दीन अन्सारी ,मोहम्मद अन्सारी या तीन जणांना अटक केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी रोशनलालची मोठी मुलगी शांती यांनी केली आहे.