मुरबाड मधील अडीच दिवसांच्या घरगुती बाप्पांना  साधेपणात  निरोप....   



मुरबाड :  या वर्षी कोरोना महामारीच्या संकटात २२ आॕगस्ट ला गणेश चतुर्थीला  गणपती बाप्पाचे साधेपणात  आगमन झाल्यांनतर काल दीड व  आज अडीच दिवसांच्या घरगुती  बाप्पांचे साधेपणात विसर्जन करण्यात आले.गूलालाची उधळण नाही, मिरवणूक नाही ,ढोल ताशे ,डीजेचा कर्कश आवाज न होता अतंत्य साधेपणात कमी गर्दीत तालुक्यातील मुरबाड शहरासह सरळगाव ,म्हसा , धसई, टोकावडे ,शिवळे परिसरातील घरगुती  बाप्पांना आज निरोप देण्यात आला.



तालुक्यात शहरासह  ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुरबाडचे  तहसिलदार अमोल कदम  व  पोलीस निरिक्षक बोराटे यांनी यंदाचा  गौरी-गणपती उत्सवासाठी नागरिकांना शासकीय नियम पाळून ,कोणतीही  गर्दी किंवा एकञ न येता  गणपती सण साजरा करण्याचे  आव्हान केले आहे. या आव्हानाला अनेक ठिकाणी नागरिकांनी उत्तमरीत्या प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत आहे. बाहेरील कोणतेही  नातेवाईकांना  किंवा मिञ मंडळी यांना न बोलावता व आपणही या काळात घरातच थांबून  देशावर व राज्यावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होण्यासाठी  विघ्नहर्ताला   साकडे  घालून  सण साजरा करताना नागरिक दिसत आहेत .


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...