आदिवासी बांधवाच्या समस्या तात्काळ सोडवा - मंत्री के.सी.पाडवी.


ठाणे : आदिवासी  घटकासाठी अनेक योजना सरकारकडून राबविल्या जातात.त्या योजना  ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजेत व आदिवासी बांधवाना त्याचा लाभ भेटला पाहिजे.त्यांसाठी त्याच्या समस्या तात्काळ सोडवा असे प्रतिप्रादन आदिवासी  विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी आदिवासी विकास योजनाची आढावा बैठक समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे केले. 


यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस आयुक्त ठाणे  ग्रामीण, डॉ.शिवाजी राठोड,संबधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्री  पाडवी यांनी तालुका निहाय आदिवासी योजनाचा आढावा घेतला व  समस्या जाणून घेतल्या.आदिवासी भागात जातीचा दाखला मिळत नसल्यामुळे विद्यार्थांना योजनाचा लाभ मिळत नाही त्यामुळे आदिवासी भागात जातीच्या दाखल्यासाठी कॅप आयोजीत करा असे निर्देश संबधिताना दिले.


आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा  शेतीविकास किफायतशीरपणे होण्याच्या दृष्टिने उपलब्ध असलेल्या  साधनांचा व उर्जेचा पुरेपूर उपयोग करुन आदिवासी भागात जे उत्पादन होते त्याच्या उत्पादनाचे मार्केटींग करणे गरजेचे आहे .वंदन केंद्र शहापूर ,यांनी आदिवासी भागात  केलेल्या कामाचे कौतूक केले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...