कोवीड ग्रस्त सदस्याने पडघा ग्रामपंचायत ऊपसरपंच निवडणुकीत केले मतदान
पडघा : वार्ताहर आज पडघा ग्रामपंचायत ऊपसरपंच निवडणुकीत कोवीडग्रस्त रेणुका पदमन पाटील या सदस्याने मतदान केले. भिनार कोवीड सेंटर येथे अॅडमीट असलेली सदस्या दुसरीकडे उपचारासाठी जात असल्याचे कारण देत थेट पडघा ग्रामपंचायत मध्ये येऊन उपसरपंच निवडणुकीत पीपीई किट घालुन मतदान केले आणि मतदान झाल्यावर पुन्हा भिनार कोवीड सेंटर येथे अॅडमीट झाले तेथील डाॅ वाघमारे यांच्याशी विचारणा केल्यावर त्यांनी आमची दिशाभुल करून रूग्ण रेणुका पाटील यांनी सदर वर्तन केल्याचे सांगीतले. परत आल्यावर रूग्णाला आम्हाला अॅडमीट करून घेणे भाग पडले.
या ऊपसरपंच निवडणुकीत भाजपा ऊमेदवार प्रणिता प्रदिप जगे यांचा पराभव करत मनसे आणि शिवसेना यांची युतीच्या मनसेच्या श्वेता शैलेश बिडवी हया ऊपसरपंच पदी निवडुन आल्या परंतु या नाटयाची चर्चा सपुर्ण गावात संतप्त आणि आश्चर्यकारक रित्या रंगली आहे. कोरानाग्रस्ताने सार्वजनिक ठीकाणी येऊन अशी कृती करणे म्हणजे इतर नागरीकांच्या आरोग्यास धोका पोहचवण्या सारखे आहे ही कृती योग्य की अयोग्य आहे शासन याबाबत काय कारवाई करेल याकडे पडघ्यातील सगळया नागरीकांचे लक्ष लागलेले आहे.