दुबईतील भारतीयांनी खासदार कपिल पाटील यांचे मानले आभार


कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये संयुक्त अरब अमिरातीतील दुबई मधील अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल, भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांचे  गणेशोत्सवाचे औचित्य साधून दुबईतील भारतीय नागरिकांनी  कृतज्ञता व्यक्त केली.  कोरोनाच्या संसर्गामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये दुबईतील (यूएई) भारतीयांचे हाल सुरू झाले होते. तेथील शेकडो कुटूंबांना परतीचा मार्ग नव्हता.


 'वंदे भारत' योजनेतून काही देशांमध्ये विमाने पाठविण्यात आली होती. मात्र, त्यात दुबईचा समावेश नव्हता. या परिस्थितीत तेथील श्रीमती शुभांगी साका व पार्थ सावर्डेकर यांच्यासह काही भारतीयांनी, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, खासदार कपिल पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी सम्पर्क करून परिस्थिती बाबत खासदार कपिल पाटील यांना माहिती दिली असता तत्काळ दखल घेऊन परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठविले होते. त्यानंतर यूएईत विमानसेवा सुरू करण्यात आली. तसेच तेथील भारतीय वकिलातीमार्फत भारतीयांना मदत देण्यात आली. अनेक भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणले गेले .
                


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...