गणेशोत्सवाकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका सज्ज; “ विसर्जन आपल्या दारी“ हा उपक्रम राबविणार
कल्याण : दिनांक २२ ऑगष्ट पासुन सुरू होणे-या गणेशोत्सवाकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिका सज्ज झाली असुन गणेशोत्सव शांततामय वातावरणात पार पडावा तसेच कोरोना साथीच्या आपत्कालीन परिस्थितीत गणेश उत्यवादरम्यान होणारी गर्दी टाळण्याकरीता महापालिका यावर्षीही “ विसर्जन आपल्या दारी“ हा उपक्रम राबविणार असुन त्यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासकिय प्रभागात मोठ्या ट्रकमध्ये ३००० लिटर पाण्याची टाकी बसवुन मुख्यचौकात घरगुती. गणपती विसर्जनाकरीता फिरविण्यात येणार आहे .
प्रत्येक प्रभाग क्षेत्रात चौकाचौकात सदर वाहन उभे ठेवण्याची वेळ निश्चित करून याबाबत उद्घोषणा करण्यात येणार आहे . कल्याण व डोंबिवली विभागातील गणपती विसर्जन स्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी महानगरपालिकेने २७ महत्त्वाच्या ठिकाणी १२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था केलेली असुन , गणेशोत्सवा दरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहीत क्षमतेचे ५२ जनरेटर बसविण्यात येणार असुन २३९५ हॅलोजन व ५८ लाइटिंग टॅावर उभारण्यात येत आहेत .
महापालिकेच्या कल्याण विभागात ३१ विसर्जन स्थळे असुन , कल्याण पुर्व येथे गावदेवी मंदिराजवळ , तिसगाव येथे कोळसेवाडी पोलिस स्टेशन जवळ , चक्कीनाका वखारीजवळ , खडेगोलवली त्याच प्रमाणे कल्याण पश्चिम येथे अनंत रिजन्सी , पारनाका तसेच विद्यपिठ परिसरात कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत .