भाजपा जिल्हा सचिव प्रदीप भोईर तफै घंटानाद आंदोलन..    


 टिटवाळा -  भाजपा कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांच्या आयोजना खाली  व माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवा़ला टिटवाळा हनुमान मंदिर जवळ मंदिरच्या दरवाजा जवळ मंदिरे सर्वांसाठी खुली करण्याबाबत घंटानाद आंदोलन करण्यात आले. 



कोरोना आजारामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत, शासनाचे सवैच मंदिरे बंद केली आहेत, जवळपास सहा महिने मंदिरे बंद आहेत, त्या मुळे त्याचावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचा रोजगार बुडाला आहे, शासनाने सवै मंदिरे सुरु करावी याकरिता भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरांच्या दरवाजा समोर घंटानाद आंदोलन करण्याचे आदेश दिले होते, त्या प्रमाणे टिटवा़ला येथील पुरातन हनुमान मंदिर जवळ भाजपा जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांच्या आयोजना खाली घंटानाद आंदोलन करण्यात आले, यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोईर, प्रविण केडिया, तिवारी गुरुजी, संखे महाजन, अपैणा सकपाळ, वंदना विणकर, नितीन केणे आदी उपस्थित  होते. 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...