उल्हासनगर- इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब ग्राऊंड फ्लोरच्या दुकानावर कोसळला.


उल्हासनगर- प्रभाग समिती 3 मध्ये दीड वर्षांपूर्वी खाली करण्यात आलेल्या ओम शिवगंगा को.ऑप.हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब ग्राऊंड फ्लोर वरील दुकानावर कोसळला आहे. ही इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने इमारती समोरील व्हीनस ते लालचक्की चौक हा रहदारीचा रोड बंद करण्यात आला असून आजूबाजूचा परिसर देखील खाली करण्यात आला आहे. ही इमारत पाच मजल्याची असून दीड वर्षांपूर्वी या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला होता.त्यामुळे इमारतीला अतिधोकादायक घोषित करून हि पालिका प्रशासनाने ३५ कुटुंबियांना आणि पाच दुकानांना खाली करून इमारतीला सिल केले होते. आज या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब हा ग्राऊंड फ्लोर वरील दुकानावर  कोसळला.


ही माहिती समजताच सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी बाळू नेटके,विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपूत, अजित साळुंके, स्थानिक नगरसेवक अरुण आशान, शेखर यादव, मिताली चानपूर,युवासेनेचे सोनू चानपूर यांनी  घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.अग्निशामकच्या जवानांनी ५० फूट परिसरातील इमारती आणि घरे खाली केली.त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी इमारती जवळच्या पोल वरील वीज खंडित केली आहे.आम्ही दीड वर्षांपासून बेघर आहोत,आम्हाला इमारत पुनर्बांधणीसाठी  परवानगी द्यावी अशी मागणी फ्लॅट धारक करत असून याबाबत आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती अरुण आशान यांनी दिली.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...