कुकसे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पुजा पाटील यांची बिनविरोध निवड 


पडघा - भिंवडी तालुक्यातील गोदाम पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व पाच गावांमध्ये विस्तार असलेल्या कुकसे गृप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पुजा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच अंजना भोईर यांनी आपसांत ठरल्याप्रमाणे  राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते त्यानुसार ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर सोनावणे यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिंनाक २८ आँगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. 


 यावेळी शिवसेनेच्या पुजा रुपेश पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली.तर यावेळी उपसरपंच आकाश चंद्रकांत पाटील,अनंता धर्मा पाटील,देवा ग्रुपचे अनंता पाटील,श्रीपत गुळवी,ज्ञानेश्वर पाटील,जीवन पाटील,गणेश राऊत,सोपान गुळवी,अंजना भोईर,दिगंबर भोईर,ग्रामसेवक भास्करराव घुडे, शिवसेना उपतालुका प्रमुख हनुमान पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...