ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी सेनेचा तीव्र विरोध
रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा विश्वनाथ पाटील यांचा इशारा वाडा: सध्या महाराष्ट्रात शासकीय, राजकीय व सामाजिक पटलावर मराठा आरक्षणाचा विषय चर्चत आहे. मराठा समाजाला सरकारने १२ टक्के आरक्षण देऊ केले आहे. मात्र हे आरक्षण ओबीसी आरक्षणातून सरकार देत असेल तर त्याला आमचा विरोध असून असे केल्यास राज्यभर रस्त्यावर उतरून आरक्षणाचा वणवा पेटवू असा सज्जड इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी आज वाडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला. राज्यात कोकण, विदर्भ, मराठवाडा व खानदेश या प्रदेशात कुणबी समाजाची संख्या सुमारे ३५ टक्के असून हा समाज अतिशय तुटपुंज्या शेतीवर गुजराण करीत आहे निर्सगाचा कोप व शासनाचे चुकीचे धोरण अपुरे शिक्षण ह्या मुळे स्वातंत्र्यानंतर हा समाज अतिशय मागासलेपणाचे जीवन जगत आहे.नोक-यांचा अभाव व तुटपुजी शेती यामुळे कर्जबाजारी झाला आहे. ओबीसी वर्गात मोडत असलेला बारा बलुतेदार वर्गही हलाखीचे जीवन जगत आहे. ओबीसी वर्गात सुमारे ३५० जातीचा समावेश करण्यात आला असल्याने कुणबी समाजाला सामाजिक न्याय यापासून वंचित केले जात आहे. वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे बाराबलुतेद...