अनुभवी फाउंडेशन तर्फे रिक्षाचालक, किन्नर समाज आणि हातावर पोट असणाऱ्या गरजूनां मदत
ठाणे : अनुभवी फाउंडेशन तर्फे ठाणे शहरात रिक्षाचालक, किन्नर समाज आणि हातावर पोट असणाऱ्या गरजू कुटुंबियांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रेल्वे अजूनही सुरू झाली नाही.
आपल्या समाजातील अनेक कुटुंब ही ह्या रेल्वेवर अवलंबून आहेत ज्याप्रमाणे रेल्वे चालू असेल तर रिक्षावाल्याना पॅसेंजर मिळतात आणि किन्नरांना आपल्या उदरनिर्वाहाचा मार्ग परंतु अद्याप हे शक्य होत नसल्याने आपण ह्या कुटुंबासाठी काही तरी करावे म्हणून “अनुभवी फाउंडेशन” ह्या संस्थेने ठाणे शहरातील ७०० कुटुंबियांना महिनाभर पुरेल इतके धान्याचे किट्स अनुभवी फाउंडेशनच्या संस्थापिका अनिता कार्ले आणि मार्गदर्शक उल्हास कार्ले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.