उल्हासनगर: मनवीसेच्या मेळाव्यात ३५० बेरोजगारांना ऑन द स्पॉट जॉब
संदीप देशपांडे यांना जामीन मिळवून देणारे ऍडव्होकेट कल्पेश माने यांचा पुढाकार
उल्हासनगर : नुकत्याच पार पडलेल्या रेल्वेच्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तसेच कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडे यांना जामीन मिळवून देणाऱ्या तीन वकिलांच्या पॅनलमध्ये असणारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या बेरोजगार युवक मेळाव्यात ३५० बेेरोजगारांना ऑन द स्पॉट जॉब मिळाला आहे.
लॉक डाऊन मध्ये बंद असलेल्या कंपन्या आता हळूहळू सुरू होऊ लागल्या आहेत.काम करण्याची क्षमता गुणवत्ता असतानाही कंपन्या कारखाने लॉक असल्याने युवक घरी होते.परिवाराला आपलाही काही हातभार लागायला हवा असा युवकांच्या मनातील विचार गृहीत धरून कल्पेश माने यांनी आमदार प्रमोद(राजू)पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लालचक्की चौकात बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले.महिन्याला १० ते १५ हजार रुपयांचा हातभार परिवाराला लागणार असल्याने युवक युवतींनी कल्पेश माने यांचे आभार मानले आहेत.
या मेळाव्यात सहभागी झालेले जिल्हाध्यक्ष सचिन कदम,उपाध्यक्ष प्रदिप गोडसे,शहराध्यक्ष बंडू देशमुख,पालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी कल्पेश माने यांचे कौतुक केले आहे.यावेळी पदाधिकारी सागर चव्हाण, संदेश भागवत,अमेय बाक्रे,पंकज तळेले,वैभव कुलकर्णी, विजय पटेकर,विशाल गवई आदी उपस्थित होते.