चाकूचा धाक दाखवून दुकानाची केली तोडफोड

पोलिसांनी वर्णनाचे आधारे आरोपीचा लावला शोध 



ठाणे : राबोडी पोलिस स्टेशन हद्दीत मुक्ती नगर परिसरात येथे राहणारे सतीश वाघधरे (४६) यांचे दुकानात त्याच परिसरातील राहणारा हर्षल राम मोहिते(२४). याने दि २६/०९/२० रोजी येऊन त्यांचे दुकानाची तोडफोड करून चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचा मोबाईल हिसकावून नेला होता  त्याबाबत ४६०/२०२० कलम ३९२,३४१,४२७,४५२,३२३ प्रमाणे गुन्हा  दाखल झाला आहे.


 सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन  वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र शिरतोडे यांचे मार्गदर्शन नुसार  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरिक्षक संदीपान सोनावणे पोलीस उप निरीक्षक महेश जाधव पो. ना. धापशी, पो. शि. खडसरे, यांनी फिर्यादीनुसार दिलेल्या वर्णनावरून हर्षल मोहिते  या आरोपीचा तात्काळ शोध घेऊन  ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला व फिर्यादी यांचा गेलेला मुद्देमाल काढून दिला तो जप्त केला.त्यामध्ये एक सुरा, एक मोबाईल आहे. सदर आरोपीस अटक करुन, न्यायालयाने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली  आहे, पुढील तपास पोलिस उप निरिक्षक संदीपान सोनावणे करीत आहेत. 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...