पालकांकडून शिक्षण शुल्क व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क घेऊ नये; मनविसेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
शहापूर: पालकांकडून इतर शुल्क न घेता फक्त शासन नियमानुसार शिक्षण शुल्क घ्यावे. तसेच फी न भरल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे पत्र तालुक्यातील शाळांना द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहापुर यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शहापुर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यांत आला आहे. तर निवेदनाच्या पार्श्वभूमीवर मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेत गटशिक्षणाधिकारी सर्व शाळांना पुन्हा शासन परिपत्रक पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.
शाळा शिक्षण शुल्क व्यतिरिक्त इतर साहित्यासह पालकांकडून फी वसूल करीत असल्याबाबत पालकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत असे निवेदनात म्हटले आहे.तर पालकांच्या म्हणण्यानुसार शाळा स्कुलबॅग, कॉम्पुटर, बुक, स्कुलबस, लायब्ररी,आदी सुविधांची सध्या गरज नाही किंवा विद्यार्थी ज्यांचा वापर करीत नाही अश्या गोष्टींची फी शाळा वसूल करीत आहेत. तसेच फी न भरल्यास ऑनलाईन शिक्षण शाळा बंद करण्याचे सांगत असल्याचा गंभीर आरोप मनविसेने दिलेल्या निवेदनात केला आहे.
तसेच सतत पालकांकडे फी तगादा लावला जात आहे. सध्या कोरोनामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने किमान शाळेची फी भरण्यासाठी सवलत द्यावी. तसेच ज्या सोयी सुविधांचा वापर विद्यार्थी करीत नाहीत त्याबाबत सूट द्यावी, तसेच फी वाढ करू नये आदी मागण्यांसह पालकांची आर्थिक परिस्थिती व सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना फी बाबत दिलासा देऊन शिक्षण शुल्क व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क घेऊ नये असे प्रकारचे असे पत्रक काढावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहापूर यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शहापुर यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
अश्या प्रकारचे पत्र न काढल्यास मनवीसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शहापूर यांना निवेदनातुन दिला आहे. यावेळी जिल्हा सचिव राकेश वारघडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोपतराव,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र निचिते ,तालुका उपाध्यक्ष दिनेश वेखंडे, शहापूर शहर अध्यक्ष विनोद पठारी ,नडगावग्रामपंचायत सदस्य विकी जयवंत मांजे पदाधिकारी उपस्थित होते.