निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिका-याची आत्महत्या
ठाणे : ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील निवृत्त अधिकाऱ्याने राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. मोहंमद शेख असे त्यांचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आर.एस. शिरतोडे यांनी दिली.
ठाणे पश्चिमेकडील कॅसलमिल येथील विकास काॅम्प्लेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर मोहंमद शेख हे त्यांच्या ४५ वर्षीय मुलासोबत राहतात.त्यांची पत्नी त्यांच्यापासुन विभक्त नेरळ येथे राहते. शुक्रवारी दुपारी मुलगा घरात झोपला असताना त्यांनी स्वतःच्या परवानाधारी रिव्हॉल्वरमधुन डोक्यात गोळी झाडली. यात शेख यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शेख यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.