कसारा लोकलच्या२२फेऱ्या वाढल्या;सर्व स्थानकात लोकल थांबत नसल्याने प्रवाश्याचे हाल सुरुच 


खर्डी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत असलेल्या लोकल मध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्यात कसारा लोकलच्या २२ फेऱ्या वाढवल्या आहेत.परंतु या लोकल ट्रेनही कल्याण-कसारा स्थानका दरम्यानच्या ८ स्थानकावर थांबणार नसल्याने प्रवाशी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत असून लोकल ट्रेन सर्व स्थानकात थाबविण्यात याव्यात अशी मागणी रेल्वे प्रवाशी करीत आहेत.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल मध्ये अनेक विभागातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवेश दिल्यानंतर लोकलमध्ये गर्दी वाढली असून आता सर्व बैंक कर्मचार्याना सुद्धा प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे.लोकल ट्रेन मधील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोरोनाच्या संसर्ग पसरु नयेत यासाठी अगोदर २४ अप-डाऊन फेऱ्या होत्या आता त्या वाढुन ४६करण्यात आल्याने कल्याण ते कसारा दरम्यान प्रवास करणाऱ्या आसनगाव व कसारा येथील प्रवाश्याना दिलासा मिळाला आहे परंतु कल्याण-कसारा दरम्यान असलेल्या खर्डी,उबरमाली,तानशेत,आटगाव, वासिंद,खडवली,आबिवली व शहाड या स्थानकावर लोकल ट्रेन थांबणार नसल्याने येथील अत्यावश्यक सेवेतील प्रवाश्याना या लोकल ट्रेनने प्रवास करता येणार नसल्याने त्याना कामावर जाण्यासाठी मिळेल त्या वहानाने जावे लागत असल्याने त्यांचे हाल सुरुच असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...