सिद्धिविनायक हॉस्पिटल बनले गरीब रुग्णांसाठी देवदूत
ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत असताना सुद्धा रुग्णसंख्या वाढतच आहे त्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी शासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे अवाहन केले आहे. हि लढाई आता फक्त शासनाची न राहता सर्वांचीच झाली आहे.
कोरोनाच्या या बिकट परिस्थिती मध्ये सामाजिक बांधिलकी जपत वर्तकनगर, ठाणे येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये परिसरामधील असंख्य रुग्णांसाठी मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या हॉस्पिटलची बिले हे खूप जास्त प्रमाणात येत असल्यामुळे नागरिक घबरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी पैशांमध्ये अत्यंत चांगल्या दर्जाची सेवा देऊन अत्यंत क्रिटिकल असणाऱ्या रुग्णांना येथे बरे करण्यासाठी डॉक्टर अमोल गीते आणि सहकारी हे खूप मेहनत घेत आहेत. कोविड रूग्णांना बेड मिळवण्यासाठी राजकीय, सामाजिक व सामान्य लोकांची स्पर्धा चालू असताना गोरगरीब लोकांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर गीते प्रयत्न करत आहेत.
रेमदेसिविर सारख्या कोरोनावर उपयुक्त असणाऱ्या औषधांचा पुरवठा होत नसतो अशा वेळी डॉक्टर हे औषध उपलब्ध करून मदत करतात. एकंदर पाहता हे हॉस्पिटल म्हणजे गोर गरीब रुग्णांसाठी हक्काचे एक आपले स्वतःचे हॉस्पिटल झाले असून येथील असंख्य गरीब रुग्णांसाठी डॉक्टर अमोल गीते देवदूत बनले आहेत. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 'कोरोनाशी लढा ' या विषयांवर जनतेसी संवाद साधत असताना घाबरुन न जाता काळजी घ्या व घराबाहेर पडत असताना मास्क लावणे, डिस्टंसींग राखणे, सॅनीटायझरचा वापर करणे, हात स्वच्छ न धुता नाक व तोंडाला न लावणे, कोरोनाचे लक्षणे दिसताच घाबरून न जाता परिसरातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रनेशी संपर्क साधने अशी पंचसुत्री सांगत सर्वांना आधार दिला. तसेच गरज असेल तेव्हा आमच्याशी संपर्क करा आम्ही आमच्या प्रमाणे मदत सुद्धा करू असे अवाहन केले.
यावेळी कोरोना महामारी मध्ये रिक्षाचालक व परिसरातील गोरगरीब लोकांना उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून परिसरातील लोकांना अन्नधान्य वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला व असंख्य लोकांना मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच हॉस्पिलच्या परिसरासह वागळे इस्टेट परिसरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता.
अशा वेळी डॉक्टरांनी आपले सर्व कर्मचारी आणि आरएसएसचे स्वयंसेवक यांची मदत घेऊन या परिसरामध्ये मास स्क्रीनिंगचा कार्यक्रम राबवला व जवळपास २० ते २५ हजार लोकांची स्क्रीनिंग करून घेतली. त्यामुळे या परिसरामध्ये रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी हातभार लागला. एवढेच नव्हे तर हा परिसर जवळपास कोरोना मुक्तीच्या दिशेने मधल्या काळामध्ये गेला होता असेही डॉ. गीते यांनी सांगितले.सामाजिक बांधिलकी जपत ठाणे परिसरामध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटल व डॉक्टर अमोल गीते यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.