कसारा : त्या मृत महिलेच्या कुटुंबियांना राष्ट्रवादीची मदत
कसारा : मोखाडा तालुक्यातील सावर्डे या तालुक्याच्या शेवटचे टोक असलेल्या गावातील वनिता पादिर हि शेतावर जात असताना नाल्यात वाहून गेली.या घटनेची माहिती मिळताच आपला माणूस आपला आमदार श्री सुनिल (भाऊ) भुसारा यांनी तात्काळ त्यांचे शिलेदार बांधकाम व वित्त सभापती काशिनाथ चौधरी यांना या परीवाराची भेट घेण्याचे निर्देश दिल्यानंतर त्यांच्या समवेत विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोठेकर,जव्हार तालुकाध्यक्ष कमळाकर धूम ,रमेश दोडे,मोखाडा तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी ,मोखाडा शहराध्यक्ष रफिक मणियार,युवा नेते सनी पवार, दिलीप जागले हभप रमेश वाघ युवा अध्यक्ष संदीप पाटील, युवराज सालकर बविआचे अमजद अंसारी द्यानंद भुसारा आदिनी या महिलेच्या कुटुबियांचे सांत्वन करून भरीव अशी आर्थिक मदत केली.
यावेळी आमदार भूसारा यांनी याठीकाणी छोट्या पुलाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे भ्रमणध्वनीवरुन कळवले.तर बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांनी याचा सर्वे तात्काळ करणार असून काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सरपंच हनुमंत पादिर भाऊ पादिर किसन पादिर काशिनाथ विठ्ठल पादिर ,मुरली कडू, गुंडबाबा रघुनाथ पादिर अशोक पादीर आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी कोरोनासारख्या आजाराशी झुंजत असतानाही आपल्या मतदारसंघातील प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून असलेल्या आपल्या माणसाचे ग्रामस्थांनी आभार मानले.कोरोना मुक्त झाल्यानंतर या गावाची भेट घेणार असल्याचेही यावेळी भुसारा यांनी कळवले आहे.