सात लाख साठ हजारांचे ममता हॉस्पिटलचे बिल मनसेच्या ऑडीटने आले ४ लाखांवर....
तब्बल ३ लाख ६२००० हजारांची रुग्णाची होणारी लूट मनसे मुळे थांबली...
ठाणे : काल डोंबिवली निवासी विभागाततील SRV ममता हॉस्पिटल ने एका रुग्णाच्या अॅन्जिओप्लास्टी चे बील ६९८००० अधिक दोन दिवसांचे बिल असे ७६०००० येवढे प्रचंड केले होते, वास्तविक रुग्णालयाने सदर उपचाराचे अंदाजित देयक ३९८००० दिले होते. पण येवढे मोठे बिल बघून रुग्णाच्या नातेवाईक घाबरले व ही लुटमारीची तक्रार मनसे आमदार राजू पाटील ह्यांचेकडे केली,
त्यानुसार मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, ज्येष्ठ पदाधिकारी संदेश प्रभुदेसाई, दीपक भोसले, नंदू ठोसर, प्रशांत परुळेकर,प्रदीप परुळेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी त्वरित संबंधीत ममता हॉस्पिटल येथे धाव घेतली व एवढ्या मोठ्या आकारणी केलेल्या बिलाचा मनसे पद्धतीने जाब विचारला, जर शासकीय निर्देशानुसार बिल तीन लाखांच्या आसपास होते तर ममता हॉस्पिटलने तब्बल ७ लाख बील कसे केले, तसेच मुबई व डोंबिवलीच्या इतर मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सुद्धा मान्य केले कि इतके बिल होऊच शकत नाही, मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर ममता हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने ७६०००० रुपयांचे बील ३९८००० असे तब्बल ३६२००० (तीन लाख बासष्ट हजार) कमी करून रुग्णाला रितसर डिस्चार्ज केले...
ह्यालाच बोलतात मनसेचे ऑडिट, मनसेचे लेखापरीक्षण, एका सामान्य रुग्णाला हॉस्पिटलच्या लुटमारीपासून वाचविले. मनसे डोंबिवली नागरिकांना आवाहन व विनंती करते की नियमबाह्य चाललेल्या खाजगी रुग्णालयाच्या लुटमारी विरोधात आवाज उठवा.