ठाणे पोलीस आयुक्तालयात महिला तक्रार निवारण दिनाचं आयोजन


ठाणे : पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन स्तरावर दर शनिवारी महिला तक्रार निवारण दिनाचं आयोजन केलं जातं. त्यानुसार काल सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं.


 या उपक्रमामध्ये महिला, पोलीस अधिकारी कर्मचारी तसंच स्थानिक समाज सेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांच्या एकूण ५०२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ३८७ तक्रारींमध्ये मार्गदर्सन आणि समुपदेशन करून तक्रारींचं निवारण करण्यात आलं. तर उर्वरीत तक्रारींची कायदेशीर बाबींनुसार पूर्तता करून निराकरण करण्यात येणार आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...