श्रमजीवी संघटनेने घातले आदिवासी विभागाचे तेरावे; खावटी अनुदान त्वरीत देण्याची केली मागणी.....
मुरबाड : गेल्या मार्च- एप्रिल महिन्यांपासून शासनाने कोरोना संकटामुळे लाॕकडाऊन घोषित केला त्यामुळे रोजगार व कामधंदे पूरता बंद असल्याने अनेक आदिवासी कुंटुंबावर उपासमारीची वेळ आली . आधिच घरात आठराविश्व दारिद्रय आदिवासींना खायची भ्रांत परंतु महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने आज पर्यंत एक दमडीही आदिवासींना दिले नसल्याने शिवाय महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने खावटी अनुदानाचे परिपञक ९ सप्टेंबरला काढले असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
या विभागाने गेली दोन वर्ष कातकरी कुंटुंबांचा फक्त सर्व्हे करण्यात चालला असून आजपर्यंत १६,७०००० /- रुपये या सर्व्हेवर खर्च झाल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. तसेच आदिवांसीच्या मुलांना लाॕकडाऊन मधे शाळा बंद असताना शिक्षणासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. अशक्य असणारे आॕनलाईन शिक्षणापासून ही मुले दूरच आहेत .
अशा मृत पावलेल्या व संवेदना बोथड झालेल्या आदिवासी विभागाचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटना मुरबाड यांनी आज मुरबाड तहसिल कार्यालयाच्या प्रवेश द्वारावरच तरुणांनी मुंडन करुन तेराव्याचा विधी उरकून अनोखे आंदोलन केले व मुरबाड तहसिलदार यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले .या वेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट् उपाध्यक्ष गणपत हिलम ,तालुका अध्यक्ष वसंत मुकणे ,तालुका सचिव दिनेश जाधव ,कातकरी घटक सचिव पंकज वाघ , महिला तालुका अध्यक्षा हिरा खोडका व आदिवासी उपस्थित होते . कोरोना संकटात शासनाचे नियम पाळून ५0 पेक्षा कमी आदिवासी सामिल झाले होते.