पडघा : प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत मार्फत कोविडची तपासणी सुरू
पडघा : प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा व ग्रामपंचायत कासणे, ग्रुप ग्रामपंचायत नांदकर, सांगे यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी तालुक्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपकेंद्र डोहोळे अंतर्गत कासणे येथे कोविड १९ रोगाची मोफत तपासणी करण्यात आली. तर मनोज प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्र पडघाच्या आमणे उपकेंद्राअंतर्गत मौजे नांदकर येथे कोविड १९ रोगाची मोफत तपासणी करण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्या कुटूंबाची आपण काळजी घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. असे पडघा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शामसिंग पावरा यांनी बोलतांना सांगितले. सर्दी,ताप, खोकला,अंगदुखी, अशक्तपणा,चव न कळणे, वास न येणे, ही लक्षणे किंवा कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या असल्यास किंवा पंधरा दिवसांपूर्वी ताज टाईफॉईड झालेला असल्यास न घाबरता कोरोना चाचणी करून घ्या. असे आवाहन यावेळी प्राथमिक आरोग्य पडघा केंद्रामार्फत करण्यात आले. सदर कोविड १९ रोग तपासणी शिबिर वैद्यकीय डॉ. शामसिंग पावरा व डॉ सोनल मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.