पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोनातून लवकर बरे व्हावेत यासाठी महायज्ञांचे आयोजन

 


 

ठाणे : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे कोरोनावर मात करून लवकर बरे व्हावे तसेच त्यांना दिर्घायुष्य लाभावे  यासाठी युवाशक्ती मित्र मंडळ व इंदिरानगर रहिवाशी यांचे वतीने महामृत्युंजय जप यज्ञाचे आयोजन करण्यात आले.

 

नगरविकास तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांना दिर्घआयुष्य मिळावे व ते लवकर कोरोना मुक्त व्हावे याकरिता युवा शक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश अग्रवाल व देवेंद्र साळवी यांनी वसंत विहार, ठाणे येथील हनुमान मंदिर व शिवसेना पदाधिकारी आणि इंदिरानगर रहीवाशी यांनी रूपादेवी मंदिर, इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे येथे होम हवन यज्ञ करून मनोभावे पूजाअर्चा केली. 

 

यावेळी युवाशक्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते विरल शहा, वैभव सकपाळ, शेखर गांगुर्डे, प्रणय सुर्वे, आशिष भानुशाली, मनीष शर्मा,निखिल कुंभार सह वागळे परिसरातील शिवसेना पदाधिकारी, इंदिरानगर येथील रहिवाशी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रार्थना करण्यासाठी उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...