२०९ बारवी प्रकल्प ग्रस्तांना नोकऱ्या;२१ वर्षाचा लढा यशस्वी;बारवी सारखा पॕटर्न महाराष्ट्रात होणे नाही - आमदार किसन कथोरे
मुरबाड: गेली २१ वर्ष प्रलंबित असलेल्या बारवी धरण ग्रस्तांच्या मागण्या मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या यशस्वी शिष्टाईने व प्रयत्नाने पूर्ण होताना दिसत आहेत. विस्थापितांचा प्रश्न तर सुटलाच आहे शिवाय बाधित कुंटुंबातील सदस्याला एम.आय. डी.सीत नोकरी मिळाली पाहिजे या साठी तात्काळीन मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व उद्योग मंञी सुभाष देसाई यांनी १२०४ प्रकल्प बाधितांना नोकरीत सामावून घेण्यासाठी शासन आदेन काढून त्यांची आज अंमलबजावणी होताना दिसत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे प्रकल्प ग्रस्तांना जमिनीचा मोबदल्यासह नोकरीचा अद्यादेश काढून नोकऱ्या मिळत असल्याने संबंध महाराष्ट्रात बारवी पॕटर्न एक रोल माॕडेल ठरला असल्याचे आमदार किसन कथोरे म्हणाले. पहिल्या टप्प्यात २०९ जणांना येत्या १ आॕक्टोंबर पासून हजर नोकरीवर रुजू होणार असून अजूनही ७२ जणांना पुढच्या टप्प्यात सामावून घेतले जाणार आहे. कोणीही ऐवजी पैसे न घेता नोकरिला प्राधान्य द्या पैसे फार काळ टिकत नाही पण नोकरी आयुष्यभर राहते कारण मी सूद्धा तुमच्या सारखाच प्रकल्प बाधित आहे तेव्हा तुमच्या व्यथा मला माहित आहेत.सध्या मिळेल त्या ठिकाणी रुजू होण्याचे आवाहन यावेळी रुजू होणाऱ्या धरणग्रस्तांना किसन कथोरे यांनी केले.
एकुण १२०४ जणांना सरकारी नोकऱ्या मिळणार असल्याने या वेळी बारवी धरणग्रस्तांच्या भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाल्या. आमदार किसन कथोरे यांच्यामुळे आज आम्हांला हा सोन्याचा दिवस पाहायला मिळत आहे मला खूप आनंद झाल्याचे जोत्सना पवार या तरुणीने आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या व आभार मानले. मुरबाड एम. आय. डी. सभागृहात या कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमासाठी सभापती श्रीकांतजी धुमाळ ,पोलीस निरिक्षक दत्ताञय बोराटे , नायब तहसिलदार बंडू जाधव , भा.ज. पार्टीचे अध्यक्ष जयवंत सूर्यराव ,जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे ,बारवी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर भोईर , माजी उपसभापती रामभाऊ दळवी ,एम.आय डी.चे अधिकारी व अनेक प्रकल्प ग्रस्त उपस्थित होते.तर या कार्यक्रमाचे सूञसंचालन संतोष चौधरी यांनी केले.