मुरबाड मध्ये भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान;जोरदार पावसामुळे भातपिके आडवे.
सरळगाव : मागील तीन ते चार दिवसांपासून मुरबाड मध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने भातपिके आडवे पडली आहेत.त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे.मुरबाड तालुक्यात जवळपास १६ हजार हेक्टर जमिनीवर भातपिकांची लागवड केली जाते.तसेच मुरबाड तालुक्याला तांदळाचे कोठारच संबोधले जाते.तसेच भातपिके लागवड करताना शेतीच्या कामांना मजूर मिळत नसून सुद्धा शेतकऱ्यांनी घरीच लागवड केली.तसेच सध्या रोजच पाऊस अधून मधून चालू असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे.तसेच यावेळी उशीरा का होईना पाऊस पडल्याने भातपिके चांगली आल्याने शेतकरी वर्ग आनंदित होता.
परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून जोरदार वादळी वाऱ्याच्या पावसामुळे भातपिके आडवी पडल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे.तसेच काही ठिकाणी कापनीला येत असलेली भातपीके सुद्धा आडवी पडली आहेत.तसेच टोकाकडे,धसई,तसेच सरळगाव विभागातील बोरगाव,सरळगाव,खांडपे, वडवली,भादाणे,कोलठन शिवले,तसेच इतर विभागात सुद्धा भात पिके आडवी पडलेली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.तसेच काही दिवसानंतर कापणीला आलेली भातपिके कापण्यासाठी पावसाने मोकळीक दयावी ,आणि शिल्लक राहिलेले पीक योग्य प्रकारे कापणी करता येईल अशी आशा बळीराजाला आहे.तसेच प्रशासनाने भातपिकांचे त्वरित पंचनामे करावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.