ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्याने विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची मनविसेची मागणी..


शहापुर : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ८ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार महाविद्यालयामार्फत  अंतिम वर्षाच्या  परीक्षा २५ सप्टेंबर पासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वीज प्रवाह सुरळीत ठेवावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शहापुर शहर शाखेचे अध्यक्ष सिध्दार्थ शिंदे यांनी केली आहे.


विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार  महाविद्यालयामार्फत ऑनलाईन परीक्षा २५ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर पर्यत  घेतल्या होणार असल्याचे  जाहीर केले आहे.  ह्या ऑनलाईन परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, इंटरनेट ह्या सामुग्रीची आवश्यकता असल्याचे परिपत्रकात नमुद केले. मात्र वीज पुरवठा खंडीत होत असल्याने  वीज पुरवठ्या अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून महावितरणने पर्यायी व्यवस्था करावी. अशी मागणी करून शहापूरच्या मनसेच्या विद्यार्थी सेनेने ह्या समस्याकडे महावीतरणचे लक्ष वेधले आहे. 


ह्या मागणीचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले असून  वीज पुरवठा सुरळीत राहिल्यास ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र सध्या शहापुर शहरात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी वारंवार होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.  त्यामुळे महावीतरणे  तांत्रिक बाबी पुर्ण करुन विज पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना वीज प्रवाहामुळे कोणतीहि अडचण होवू नये यासाठी उपाययोजना कराव्यात. व पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शहापुर शहर शाखेने उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय शहापुर यांचेकडे केली आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...