जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने रक्तदान शिबिर संपन्न
वाडा : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवारी वाडा येथील संस्थेच्या संपर्क कार्यालयात जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिका पानवे यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ८४ रक्तदात्यांनी रक्तदानाचे महान कार्य बजावले ब्लड बॅक जव्हार येथील डॉ.रामेश्वर गरूड यांच्या टीमने रक्त संकलनाचे काम केले.
या कार्यक्रमास पालघर जिल्हा परिषद चे राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते नरेश आकरे, वाडा पंचायत समितीचे उपसभापती जगदीश पाटील, जि.प.सदस्य शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर सांबरे,संदेश ढोणे, विक्रम गड नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष निलेश (पिंका) पडवले, सायली सिंलधनकर, विक्रम गड पंचायत समितीचे सदस्य विनोद भोईर, जिजाऊ संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, कोकण विकास कामगार संघटनेचे सरचिटणीस महेंद्र ठाकरे,माले ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजु देसले आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ संस्थेचे सदस्य अरविंद देशमुख व अन्य कायॅकत्यांनी विशेष परिश्रम घेतले.