उल्हासनगरातील ऍडव्होकेट कल्पेश माने पक्षपातळीवर प्रकाशझोतात...
उल्हासनगर : अलीकडेच रेल्वेच्या कायदेभंग आंदोलनात अटक करण्यात आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडे यांना दोनदा जामीन मिळवून देण्यासाठी उल्हासनगरातील ऍडव्होकेट कल्पेश माने यांनी सहभाग घेतला आहे.त्यामुळे माने हे पक्षपातळीवर प्रकाशझोतात आले आहेत.
रेल्वेच्या आंदोलन प्रकरणात संदीप देशपांडे यांच्या सोबत संतोष धुरी,गजानन काळे,अतुल भगत या चौघांना अटक करण्यात आली होती.न्यायाधीश डी. जे.कळसकर यांच्याकडे युक्तिवाद झाला.आरोपींनी लॉकडाऊनचे नियम मोडीत काढले असून शासनाच्या नियमांचे पालन करू नका असे जनतेला उक्सवले आहे.त्यामुळे त्यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली.
तर आंदोलनकर्त्या आरोपींनी जे आंदोलन केले ते जनतेच्या हिताचा विचार करून.ते उच्चशिक्षित असून ते पर्मनंट रहिवाशी आहेत.पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने इतर कलम लावले असून त्यांचा जामीन मंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद आरोपींचे वकील ऍडव्होकेट अक्षय काशिद,कल्पेश माने,शर्मा यांनी केला असता,यापुढे रेल्वे परिसरात फिरू नये,लोकांना रेल्वे आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन देऊ नये,तपासी अधिकारी यांना सहकार्य करावे,तसेच साक्षीदार आणि पुरावा नष्ट करू नये अशा अटीवर न्यायाधीश यांनी १५ हजार रुपयांवर जामीन मंजूर केला.याच प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त लोहमार्ग दीपक फटांगरे यांच्याकडे १०७ कलमा अंतर्गत सुनावणी झाली.तिथे २५ हजार रुपये भरण्याचे किंवा जामीन देण्याचे आदेश देण्यात आले.तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते राजेश उजैनकर व उल्हासनगर पालिका युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांनी जामीनदारांची व्यवस्था केल्याने संदीप देशपांडे यांच्यासह चौघांना जामीन मंजूर करण्यात आला.