पालघर पोलीसांनी विना परवाना रेती उत्खनन करणा-यांवर कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त

 



 ठाणे : विना परवाना रेती उत्खनन करून पर्यावरणाचा -हास करणा-यांवर कारवाई करून ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पालघर पोलीसांनी जप्त केला आहे. तानसा-वैतरणा नदीच्या पात्रात काही व्यक्ती विना परवाना रेती उत्खनन करत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती.


 त्यानुसार पोलीसांनी दोन ठिकाणी छापा टाकला असता रेती उत्खनन करत असलेले काही लोक पळून गेले. परंतु तेथील मुद्देमाल आणि रेती पोलीसांनी जप्त केली. पोलीसांनी त्या ठिकाणाहून १६५० ब्रास रेती, १५२ सक्शन पंप, २३० बोटी, १ जेसीबी असा एकूण ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...