शिवसेनेच्या वतीने उल्हासनगर पालिकेला ९ रुग्णवाहिका सुपूर्द....

आदित्य ठाकरे यांची वचनपूर्ती; गोपाळ लांडगे यांच्या हस्ते लोकार्पण.. 



उल्हासनगर : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका देण्यात येणार असे वचन दोन महिन्यांपूर्वी दिले होते.ठाकरे यांनी दिलेल्या वचना प्रमाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेला एक कार्डिअक सह ९ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले असून चाव्या महापौर लिलाबाई आशान,आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या सुपूर्द केल्या आहेत.


शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे शिवसेनेने  समाजकारणाला अधिकांश प्राधान्य दिले असून स्थापनेच्या काळापासून रुग्णांची सेवा करण्यात,आपात्कालीन परिस्थितीत धावून जाण्यात महाराष्ट्रात नंबर १ आहे.असे प्रतिपादन यावेळी गोपाळ लांडगे यांनी केले.कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या नगरसेवकांनी रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले होते.त्यामुळे नगरसेवक राजेंद्र देवळेकर, सुनील सुर्वे,दशरथ घाडीगांवकर सह महाराष्ट्रातील अनेक जणांचा बळी गेला. कोणत्याही संकटात शिवसेना मागे हटत नाही.असे जेष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी सांगितले.शिवसेनेने रुग्णवाहिका दिल्या असून येत्या काळात कोरोना संपुष्टात आल्यावर यापैकी काही रुग्णवाहिका शासकीय रुग्णालयाला देण्यात याव्यात.खाजगी मंडळी मुंबईला जातात गरीब रुग्णांकडून अमाप पैसा आकारतात.ते पाहता या रुग्णवाहिकांचा  माफक दर ठेवण्यात यावा असे आवाहन उपमहापौर भगवान भालेराव यांनी आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना केले.


बाळासाहेब ठाकरे क्रीडासंकुलाच्या आवारात लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,महापौर लिलाबाई आशान,आयुक्त डॉ.राजा दयानिधी,उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, उपमहापौर भगवान भालेराव,शहरप्रमुख सभागृहनेते राजेंद्र चौधरी,अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर,मुख्यलेखा परीक्षक मंगेश गावडे,सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी,वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप पगारे,उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,नगरसेवक सुरेंद्र सावंत,नगरसेविका शितल बोडारे,वसुधा बोडारे आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रकाश माळी यांनी केले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...