सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यास मुंब्र्यात कोणत्याच कार्यक्रमाला येणार नाही :  जितेंद्र आव्हाड


ठाणे : मुंब्र्यात  कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून ही धोक्याची घंटा आहे. मात्र तरीही नागरिक सोशल डिस्टनसिंगचे पालन करत नसल्याने यापुढे एक महिना मुंब्र्यात कोणत्याच कार्यक्रमाला येणार नसल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 


मुंब्र्यात अद्ययावत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीतर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बाईक रॅलीत आणि रुग्णवाहिका सेवेच्या शुभारंभाच्या वेळी सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा उडाला. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यापुढे जर याबाबत पालन केलं गेलं नाही तर यापुढे महिनाभर मुंब्र्यात येणार नसल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...