अधिकार नसतानाही क्लिनप मार्शलकडुन कोरोना बाबतची दंड वसुली ; मनसे कार्यकर्त्यांनी उघड़ केला प्रकार


कल्याण : कल्याण डोंबिवलीतील प्रमुख परिसरात कचरा आणि घाण होऊ नये यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नेमलेले “ क्लिनप मार्शल “ पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत . कोरोनाबाबतचे नियम न पालना-या नागरीकांवर कारवाईचे कोणतेही अधिकार नसताना हे “ क्लिनप मार्शल “ लोकांकडून त्याबाबतच्या दंडाची वसुली करत असल्याचा धक्कादायक प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे .  
                 
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात कचरा आणि घाणमुक्त राहण्यासाठी महापालिकेने याठिकाणी ठेकेदारामार्फत “ क्लीनप मार्शल “ नियुक्त केले आहेत . स्टेशन परिसरातील रस्त्यांवर पान- गुटक्याच्या पिचका-या मारणा-या , थुंकणा-या किंवा कचरा टाकणा-या नागरीकांकडुन दंड वसुलीचे प्रमुख अधिकार त्यांना देण्यात आले आहेत . मात्र ही जबाबदारी सोडुन हे “ क्लिनप मार्शल “ कोरोना बाबतचे नियम न पालल्याच्या नावाखाली नागरीकांकडून मनमानी पध्दतीने दंडवसुली करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहीती मनसेचे कल्याण शहर संघटक रूपेश भोईर यांनी दिली .


 या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी भोईर हे मनसे कार्यकर्त्यांसह आज सकाली कल्याण स्टेँशन परिसरात दाखल झाले आणि त्यांनी अशा प्रकारची बेकायदेशिर वसुली करताना “ क्लिनप मार्शल “ ला रंगेहात पकड़ले . मास्क लावला नाहीं म्हणून एका नागरीकाकडून ५०० ते १००० रूपये हा “ क्लिनप मार्शल “ उकलत असल्याचे दिसुन आले . या “ क्लिनप मार्शल “ ला पकडुन भोईर यांनी महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधीन केले . याप्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात ४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...