श्रमजीवी संघटनेतर्फे आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर "तेरावे" चे आंदोलन....



शहापुर : प्रत्येक आदिवासी बांधवांना सरसकट खावटीचा लाभ मिळावा ह्या मागणीसाठी शहापूरात श्रमजीवी संघटनेतर्फे  मंगळवारी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर "तेरावे" चे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तेराव्याचा विधी करून श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.


लॉकडाउन काळात आदिवासीं बांधवांना दिलासा मिळेल या अपेक्षेने श्रमजीवी संघटनेने प्रचंड पाठपुरावा, हक्काग्रह आंदोलन, जनहित याचिका इत्यादी सर्व मार्ग वापरून खावटी मिळण्याबाबत लढा दिला. त्यानंतर  खावटी देण्याचे जाहीर करूनही सात महिने उलटूनही आदिवासीं बांधवांना खावटी देण्याची योजना कागदावरच राहिली आहे. त्यामुळे मंगळवारी आदिवासीं बांधवांना अन्न आणि शिक्षण यापासून वंचित ठेवण्याचा आरोप करून आदिवासी विभागाच्या   आदिवासी विकास प्रकल्प  कार्यालयाच्या समोर श्रमजीवी संघटनेने तेरावा घालण्याचे अभिनव आंदोलन केले.  व यावेळी श्रमजीवी संघटनेने  मागण्यांचे निवेदन दिले.



 यावेळी केलेल्या मागण्यांमध्ये प्रत्येक आदिवासी कुटुंबाला खावटी योजनेचा लाभ विनाविलंब तात्काळ देण्यात यावा, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी  लागणारी अनलॉक लर्निंग उपक्रमाद्वारे कृतीपुस्तिका व हस्तपुस्तिका  विनाविलंब उपलब्ध करण्यात याव्यात. तसेच शासकीय, अनुदानित, नामांकित आश्रमशाळा व शालेय शिक्षण विभागातील  सर्व शिक्षकांचे एकत्रिकरण करुन प्रत्येकगावागावात शिक्षक पोहचतील हे पहावे. व त्या गांवातील स्वयंसेवक व शिक्षक यांच्यामार्फत शिक्षण सुरु करावे.


 तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा व आश्रमशाळा येथिल मुलांचा मध्यान्ह भोजन आहार भत्ता सहा महिन्यापासून प्रलंबित आहे तो त्वरित देण्यात यावा. मध्यम तिव्र कुपोषित मुलांनाही अति तीव्र मुलाप्रमाणे vcdc सुरू करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष राजेंद्र म्हसकर, तालुका सचिव प्रकाश खोडका, जिल्हा कातकरी उपप्रमुख मालु हुमणे, जिल्हा युवा उपप्रमुख प्रविण जोगले, तालुका युवा सचिव रुपेश आहिरे, कैलास घाटाळ आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...