शहापूर : २ ऑक्टोबरला काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन....
शहापुर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशानुसार शहापूरात २ऑक्टोबरला काँगेस तर्फे कृषि विधेयका विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कृषी विधेयकाच्या विरोधात २ ऑक्टोबरला 'किसान मजदूर बचाव दिन' पाळला जाणार असून या तिन्ही विधेयकांच्या विरोधात शहापुर तालुका काँग्रेस कमिटीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच हे धरणे आंदोलन सोशल डिस्टन्सचे पालन करून करणारं असल्याचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष महेश धानके यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
ह्या धरणे आंदोलनात तालुक्यातील पदाधिकारी, शहर व विभागीय अध्यक्ष ,तालुका सदस्य यात सहभागी होणार आहेत. यावेळी काँग्रेस तर्फे राष्ट्रपतींना दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्याच्या अभियानाचा शुभारंभही करण्यात येणार असल्याचे धानके यानी सांगितले आहे.