मुरबाड तालुका अध्यक्षा योगिता शिर्के यांचा आगळावेगळा सामाजिक संकल्प 


 सरळगाव : मुरबाड तालुका  महिला अध्यक्षा योगिता अशोक  शिर्के यांनी नुकतेच  सामाजिक वनीकरण विभागामार्फत मौजे बळेगाव व किसळ येथे  तालुक्यातील  दहा हजार रोपांच्या वाटपाचा शुभारंभाचा  कार्यक्रम आयोजित केला होता. पर्यावरण संवर्धन व सामाजिक जाणीवेतून योगिता  शिर्के  यांनी  केलेल्या कामाचे समाजातील सर्वच स्तरांतून कौतुक आज  होत आहे. आजपर्यंत महिलांवरील अन्याय ,बचतगटांचे सक्षमीकरण ,महिलांच्या विविध योजना तसेच सर्वच क्षेत्रांत त्यांचं योगदान लाभलं आहे.


 आजच्या महिला अबला नाहीत, तर त्या सबलाच आहेत. हा आदर्श योगिता  शिर्के यांनी  समाजात बिंबविला आहे.  सदर कार्यक्रम ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष  पवार यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.  या कार्यक्रमासाठी  मुरबाड वनक्षेत्रपाल अधिकारी वाळींबे  यांचे  विशेष सहकार्य लाभले.सदर रोपांच्या वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत मागणीनुसार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे योगिता  शिर्के यांनी सांगितलं.


याप्रसंगी  बाजार समितीचे समितीचे माजी चेअरमन चिंतामन घोलप गुरुजी , शिवसेना तालुकाप्रमुख  कांतीलाल कंटे, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी  सदस्य  संजय पवार , विद्यमान जिल्हा परिषद सदस्या  रेखा कंटे ,ठाणे जिल्हा महिला शिवसेना  उपसंघटक उर्मिला लाटे , शिवसेना उपतालुकाप्रमुख जयवंत पडवळ, ज्येष्ठ कार्यकर्ते बुधाजी मोरे ,लक्ष्मण पवार,माजी उपसरपंच जयवंत पडवळ,माजी उपसरपंच शिवाजी खंडागळे, शिवसेना कार्यकर्ते जयवंत पडवळ ,विजय खंडागळे  गुरुजी,रमेश पडवळ,कचरू तिवार ,नाना पवार ,महिला कार्यकर्त्या कल्पना पवार ,एकनाथ व्यापारी ,दत्तात्रेय शिंगोळे ,अरुण पवार ,इस्माईल शेख आदी उपस्थित होते.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...