भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान भारत कार्ड वितरण


भिवंडी‌ : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण चा वतीने खारबाव जिल्हा परिषद गटातील पाये, पायगाव, मालोडी व ब्राह्मणगाव या भागातील तब्बल  १५०० लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजना कार्ड चे वाटप उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश श्री देवेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  


सदर कार्यक्रमास ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री श्रीधर पाटील, तसेच इतर जिल्हा स्तरीय पदाधिकारी रामनाथ पाटील, राम माळी, वसंत पाटील, गोरखनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी स्व. महादेव बाबुराव चौघुले यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. संपूर्ण जग कोरोना विरोधात लढत असताना भाजप पक्ष सेवा धर्म जोपासत समाजातील तळागळापर्यंत मदत घेऊन पोहचत आहे, असे मत श्री देवेश पाटील यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मयुर पाटील, विजय मुकादम आणि प्रफुल्ल तांगडी यांनी केले.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...