केंद्र सरकारच्या विविध योजनांचे मांडा-टिटवाळा येथे शिबीर पार पडले ..
कल्याण : केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत. याचा लाभ गरजूंना नागरिकांना मिळावा म्हणून टिटवाळा येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात १ महिना जेष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजनांचे कॅम्प राबविले असता ४५० लाभार्थींनी याचा लाभ घेताला. या उपक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर आणि स्थानिक नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भोईर यांनी केले होते.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना, जेष्ठ नागरिक कार्ड, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन या योजनेचे काही कार्ड वाटप नुकतेच करण्यात आले. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेमार्फत नागरिकांना ५ लाखाचा विमा, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत लाभार्थ्यांना २ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ घेता येणार आहे. तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजनेमार्फत प्रतिमहिना ३ हजारांपर्यंत पेंशनचा लाभ घेता येणार आहे. तर जेष्ठ नागरिक कार्ड मध्ये विविध फायदे घेता येतील.
यावेळी माजी उपमहापौर, नगरसेविका उपेक्षा भोईर, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तीवान भोईर, जेष्ठ कार्यकर्ते सुरेश खांबोरकर, वॉर्ड क्रमांक ८ चे अध्यक्ष गजानन मढवी, वॉर्ड क्रमांक १० अध्यक्ष किरण रोठे, कार्यकर्ते विवेक पुराणिक, संजय आदगळे, विजय देशमुख, वैभव पुजारी, केतन कान्हेरे, विनायक भोईर, अजय मिश्रा, अरविंद पाटील, किरण पाटील, कमलेश राठोड आदींच्याहस्ते कार्ड वाटप करण्यात आले.