बहुजन तरुणांचे न्याय व हक्क मिळवण्यासाठी दलित युथ पँथर मध्ये प्रवेश


कर्जत : बहुजन तरुणांच्या न्याय हक्क मिळवण्यासाठी व अन्याय अत्याचार रोखण्यासाठी दलित युथ पँथर कर्जत मध्ये पँथर गर्जना करत रायगड जिल्हा कार्यकारणी , कर्जत ,खालापूर व पनवेल तालुका कार्यकारणी पदी नियुक्ती करण्यात आली. बहुजनांच्या अन्याय अत्याचार रोखण्यासाठी फक्त आवाज न उठवता त्याला प्रतिकार करणारी संघटना म्हणजे दलित पँथर. नामदेव ढसाळ, राजा ढाले ,भाई संगारे , ज.वि.पवार ह्यांच्या क्रांतिकारी विचारांची प्रेरणा घेऊन समाजकार्य करणारी दलित युथ पँथर ही संघटना आहे.


कर्जत तालुक्यातील तक्षशिला बौद्ध विहार कडाव येथे , नियुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन रायगड जिल्ह्यातील बहुजनांचा ढाण्या वाघ पत्रकार सुशिल भाऊ जाधव यांनी केले होते. नियुक्ती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाई साहेब जाधव संस्थापक - अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश , बापू साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश , विजय भाई जाधव अध्यक्ष - रायगड जिल्हा , हरीश मोरे प्रसिद्धी प्रमुख रायगड , प्रशांत पारध्ये प्रवक्ते - रायगड उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते रायगड जिल्हा पदाधिकारी पदी अंकुश सुरवसे जि. युवा अध्यक्ष , प्रवीण रोकडे जि. उपाध्यक्ष , कर्जत तालुका पदाधिकारी पदी अनिरुद्ध पवार ता. अध्यक्ष ,गणेश नाईक ता. सचिव ,रोशन गोतारने ता. युवा अध्यक्ष ,रोहित ढोले ता. कार्याध्यक्ष ,मीना ताई काकडे ता. महिला अध्यक्ष ,  रोहिदास सोनावणे ता. युवा उपाध्यक्ष ,निलेश गायकवाड ता. संघटक , पत्रकार महेश साळवी सर ता. प्रसिद्धी प्रमुख , खालापूर तालुका पदाधिकारी पदी रोशन मोरे ता. अध्यक्ष ,सुरज केदारी ता. सचिव ,रोहित गायकवाड ता. युवा अध्यक्ष ,अमित केदारी ता. सल्लागार ,सागर केदारी ता. युवा उपाध्यक्ष ,आविष्कार केदारी ता. प्रसिद्धी प्रमुख ,ऋषिकेश जाधव ता. संघटक ,मयूर कांबळे ता. युवा सचिव ,पनवेल तालुका पदाधिकारी पदी सुदर्शन साबळे ता. अध्यक्ष , संतोष डोंगरदिवे ता. कार्याध्यक्ष ,सागर इंगळे ता. संघटक ,शैलेश कांबळे पनवेल शहर अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. 


नियुक्तीची घोषणा विजय भाई जाधव अध्यक्ष रायगड जिल्हा यांनी केली. उपस्थित तरुणांना विजय भाई जाधव , प्रशांत पारध्ये यांनी मार्गदर्शन केले. बहुजनांच्या अन्याय-अत्याचाराच्या विरुद्ध लढा करण्याचं समाजकार्य करण्या साठी संघटनेची स्थापना झाली असून, संघटनेच्या माध्यमातून मुंबई झोपडपट्टी मधील घरांची समस्या सोडवण्यासाठी मदत केली, बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका अश्या अनेक आस्थापणेत जवळपास १०  हजारांहून अधिक नोकऱ्या मिळण्यास मदत करण्याचं काम संघटनेने केलेलं आहे.रायगड जिल्हा मधील १० MIDC मध्ये नोकरी मिळून देणाचे काम यापुढे संघटनेच्या माध्यमातून करू असे पत्रकार सुशिल भाऊ जाधव म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त अंकुश सुरवसे यांनी केले.



"जातीवादयांवर आपली दहशत कायम राहील तू फक्त आवाज दे पँथर धावून येईल.कठीण परिस्थितीत तरुणांच्या पाठीशी न राहता बरोबर राहून प्रश्न सोडवण्यास मदत करू. रायगड जिल्ह्यातील तरुणांना नोकरी व व्यवसाय स्थापन करण्यास शक्य तेवढी मदत करू."



भाई साहेब जाधव
दलित युवा पँथर
संस्थापक । महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...