मोखाडा तालुक्यातील सावर्डे येथे पुरात वाहुन गेलेल्या महिलेच्या कुटुंबाचे सांत्वन 


कसारा: मोखाडा तालुक्यातील सावर्डे येथील देवीचा नाला ओलांडताना अचानक पूर आल्याने वनिता पादीर (३५) ही महिला वाहून गेली होती. तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी आढळला. या पीडित कुटुंबाची मोखाडा पंचायत समिती सभापती सारिका निकम तहसीलदार सागर मुंदडा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. शिवसेनेच्या वतीने आर्थिक मदत केली. 


मुसळधार पावसाने सावर्डे  गावच्या मागील बाजूस असलेल्या देवीच्या नाल्यातला पूर आला होता .त्यात आदिवासी महिला शेतावरून घरी परतत असताना वाहून गेली होती . त्या कुटुंब एकमेव कमावती होती . तिच्यावर तीन मुलासह पती अवलंबून होते . पंचायत समिती सभापती सारिका निकम तहसीलदार सागर मुंदडा  जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी तातडीने पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे. या नाल्यावर साकव व लहान  पुल बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभापती सारिका निकम यांनी ग्रामस्थांना दिली आहे. 


यावेळी शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम जिल्हा परिषद सदस्य  कुसुम झोले पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे शाखा अभियंता भुसारा सरपंच हनुमंत पादीर भाजपा आदिवासी विकास आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष मिलिंद झाले व ग्रामस्थ उपस्थित होते  .


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...