राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक महिला कार्यकर्ती वाघिण आहे- मा. सौ. रूपालीताई चाकणकर
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक महिला कार्यकर्ता ही वाघिण आहे.त्यामुळे महिलांवरील अत्याचाराविरोधात शांत बसू नका.अन्याय, अत्याचाराविरोधात संघर्ष करा,असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केले. तसेच, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे महानगर पालिका निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची स्वतंत्र फळी सज्ज करा.अशी सूचनाही यावेळी सौ. चाकणकर यांनी केली. बुधवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा,येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस, ठाणे शहर जिल्हा, कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा,उल्हासनगर शहर जिल्हा,भिवंडी शहर आणि ठाणे ग्रामीण मधील पदाधिका-यांची तसेच जिल्ह्यातील सर्व बुथ कमिट्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी महिला प्रदेश अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक तथा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, ठामपा च्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती. प्रमिलाताई केणी,संघर्ष महिला संघ च्या अध्यक्षा सौ.ऋताताई आव्हाड मंचावर...