वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करुन जपली सामाजिक बांधिलकी
मुरबाड: देशासह राज्यभर कोरोनाचे महाभयंकर संकट असताना या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे . सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा आहे राज्याची व देशाची गरज ओळखून मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य व आमदार किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक तालुक्यातील भाजपार्टीचे युवा नेतृत्व अनिलजी घरत यांनी आपल्या ३७ व्या वाढदिवसाला कोणताही डाम डौल न दाखवता रक्तदान शिबिराचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अनेक रुग्णांना महत्त्वाच्या सर्जरी साठी रक्ताची नितांत गरज असते परंतु अचानक पणे हे रक्त उपलब्ध होत नाही काही वेळा रक्ता अभावी पेशंटचा मृत्यूही ओढवतो. म्हणुन आपल्या वाढदिवसाला रक्तदान शिबिराचे आयोजन करुन अनिल घरत यांनी तालुक्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
टोकावडे - धसई परिसरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या १०३ तरुणांनी या शिबिरात रक्तदान केले. या साठी संकल्प ब्लड बॕक कल्याण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिराला जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. नंदा उघडा , माजी सभापती दत्तु वाघ, मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती सौ. अरुणाताई खाकर , माजी उपसभापती सौ.सिमा घरत यांच्यासह असंख्य नागरिक व तरुणांनी भेट देऊन आपला सहभाग नोंदविला.