ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं बिबळ्याचं कातडं विकण्यासाठी आलेल्या दोघांना केलं जेरबंद



ठाणे :  गुन्हे अन्वेषण शाखेनं बिबळ्याचं कातडं विकण्यासाठी आलेल्या दोघांना जेरबंद केलं आहे. ठाण्यामध्ये सिडको बस स्टॉप जवळ दोन जण बिबळ्याचं कातडं विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी सिडको बस स्टॉपजवळ पाळत ठेवली होती. ठरलेल्या वेळी दोन व्यक्ती एक बॅग घेऊन येताना त्यांना दिसल्या. 


पोलीसांनी थांबवून त्यांची चौकशी केली आणि बॅगची तपासणी केली असता या बॅगेमध्ये एक बिबळ्याचं कातडं पोलीसांना आढळलं. वन विभागाच्या अधिका-यांनीही हे बिबळ्याचंच कातडं असल्याचं स्पष्ट केलं. सचिन भोसले आणि शहाजी दांडे हे दोघे पुण्यातील भोसरीचे रहिवासी असून काळ्या बाजारात या बिबळ्याच्या कातड्याची किंमत १० लाख रूपये असल्याचं सांगितलं जातं. पोलीसांनी वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली असून हे कातडं नक्की कुठून आणलं याची माहिती मात्र अद्याप या दोघांनी पोलीसांना दिलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक शोध घेत आहेत.


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अंबरनाथमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

"तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमचीच इच्छा.. "; फडणवीसांनी दिला इशारा

दोनशे वर्षांची परंपरा असलेली म्हसा यातल्या अखेर रद्द...