रायगडात सुडाचे राजकारण यापुढे खपवून घेतले जाणार नाही - प्रवीण दरेकर
पेण : तटकरे हे रायगडात सुडाचे राजकारण करत आहेत पुन्हा असा प्रयत्न केला तर खपवून घेतला जाणार नाही या राजकारणात मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन बळी पडले आहेत आमदार रवीशेठ पाटील यांच्या घरात रात्री झाडाझडती करताना त्यांना लाज वाटली पाहिजे तसेच पोलीस सुतारवाडीची झाडाझडती करतील का असा घाणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पेण येथे बोलताना केले.
१६ ऑक्टोंबर रोजी पेण नगराध्यक्ष यांच्या दालनात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने बांधकामाच्या मुद्द्यावरून संबंधितांना नोटिसा बजावल्याने गटनेते व मुख्याधिकारी यांच्यात खडाजंगी झाल्याने मुख्याधिकारी यांनी गटनेते यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यावरून ३५३ कलम लावण्यात आले होते प्रशासकीय काम करताना जनतेच्या प्रश्नासाठी अनेकदा आवाज उठवावा लागतो याआधी असे अनेक प्रकार घडले आहेत परंतु कुठेही ३५३ कलम लावण्यात आले नव्हते परंतु खासदार यांच्या दबावामुळे मुख्य अधिकारी व पोलीस प्रशासनाने हे कलम लावून आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली होती हे चुकीचे असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पेण शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.पेणमधील व्यापारी भाजीवाले व सर्व सामान्य जनतेने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रवीशेठ पाटील यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले वैकुंठ निवास येथून महामेळावा निघून तो शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग कोतवाल सभेत रूपांतर झाले.
यावेळी विधानसभेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार रवीशेठ पाटील माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार निरंजन डावखरे पनवेल नगराध्यक्ष जगदिश गायकवाड परेश ठाकूर महेश मोहिते प्रीतम पाटील संतोष शेट्टी मोनिका महांवर अनिता पाटील समीर ठाकूर हेमलता म्हात्रे सुशीला घरत सोपान जांभेकर श्रीकांत पाटील हिमांशू कोठारी बंडू खंडागळे बालाजी म्हात्रे भास्कर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तटकरे कुटुंबीयांच्या दडपशाहीच्या विरोधात पेणकरांनी दुकाने बंद करू रवीशेठ पाटील यांच्यासोबत असल्याचे दाखवून दिले तटकरे जिल्ह्याचे पालक नाहीतर मालक म्हणून वावरत आहे हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले तर घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर चुकीच्या पद्धतीने एखाद्या अधिकारी करत असेल तर त्या अधिकाऱ्याच्या चौकशी होणे गरजेचे आहे ३५३ कलम हा त्यातील एक प्रकार असून १६९ कलमाखाली हे काढून घेता येऊ शकते शासकीय अधिकार्यांनी काम करताना सभागृहाचे पवित्र राखले पाहिजे चुकीच्या पद्धतीने कायद्याचा वापर होत असेल तर अशा अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले तर लोकांच्या प्रश्नांसाठी सभागृहात आवाज उठवणे गैर नाही कोणाच्या तरी सांगण्यावरून हा प्रकार असून सुस्थितीत चालवलेल्या कारभारात वाईट भूमिकेतून काम करीत आहेत हे खपवून घेतले जाणार नाही.
तटकरे अर्थमंत्री असताना बँकेचे प्रश्न सोडवता आले नाही तर आता काय सोडणार असे आमदार रवीशेठ पाटील यांनी सांगितले.तर प्रशासकीय काम करताना मी अनेक वेळा आक्रमक होऊन जनतेच्या प्रश्नासाठी भांडत असतो त्यामुळे ३५३ कलम माझ्यावर अनेक वेळा लागले पाहिजे होते पेण येथील प्रकार चुकीचा असून या प्रकरणाची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल असे पनवेल नगराध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी सांगितले तर सत्तेची दडपशाही पेणकर सहन करणार नाही सत्तेचा माज जनताच उतरवणार असे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी सांगितले तर राज्यशासन व पोलीस यंत्रणेचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच रायगडातील हुकूमशाही चार निषेध करून तटकरेना रायगड मधील जनता माफ करणार नाही असे पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सांगितले.